39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ ओबीसींच्या हक्क अधिकाराकरीता मंडल यात्रा-जि.प.सदस्य जगदिश बावनथडे

ओबीसींच्या हक्क अधिकाराकरीता मंडल यात्रा-जि.प.सदस्य जगदिश बावनथडे

0
210

blank

तिरोडा,दि.०९ः-ओबीसी समाजाच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना ही अत्यावश्यक असल्याचे तसेच ओबीसी विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ घ्यावा या मुख्य उद्देशाला घेऊन २ आँगस्टपासून ओबीसी युवा अधिकार मंचचे संयोजक उमेश कोराम व ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या यात्रेचे तालुक्यातील डाकराम सुकडी येथे(दि.०६) स्वागत करण्यात आले.याप्रसंगी बोलतांना जिल्हा परिषद सदस्य जगदिश बावनथडे यांनी मंडल आयोगाने शेतकरी कामगार जातींचे ओबीसी अस्तित्व निर्माण केले आहे.परंतु अजूनही मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू झालेल्या नाहीत,त्या लागू व्हावे व ओबीसींना हक्क अधिकार मिळावे याकरीता ही मंडल यात्रा असल्याचे सांगितले.

डाकराम सुकडी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हा परिषद सदस्य जगदिश(बालू)बावनथडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मार्गदर्शन सभेला ओबीसी अधिकार मंचचे खेमेंद्र कटरे,कैलास भेलावे,ओबीसी युवा वक्ते निखिल बनसोड,ओबीसी सेवा संघाचे भुमेश ठाकरे,डाॅ.पारधी,मंंडल यात्रेतील सहकारी शंकर पाल, सुभाष उके,संविधान मैत्री संघाचे अतुल सतदेवे,सुनील मेश्राम,संदीप कुर्वे,हर्षवर्धन मेश्राम,जगदीश जांभुळकर,मंगेझरी सरपंच छायाताई टेकाम,भोजराज उईके,विजय बिसेन,खुमेंद्र राहांगडाले,देवेंद्र चौधरी,दिनेश बिसेन, हिमानीताई बिसेन,चंद्रशेखर बिसेन,पौडकर सर, गोदे सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.blank

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना उमेश कोराम यांनी ओबीसींची जातनिहाय जनगणना का महत्वाची आहे.अर्थसंकल्पात संख्याप्रमाण वाटा मिळत नाही तोपर्यंत ओबीसी,एसबीसी, व्हीजे एनटी समाजाच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार नाही. म्हणून सर्वांनी मंडल ओबीसी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करीत वसतिगृह, महाज्योती संस्थेच्या योजनांची माहिती दिली.ओबीसी वसतिगृहात प्रवेशाकरीता आपल्या भाऊ बहिणींपर्यंत माहिती पोचवून नीट,जेईईसारख्या अभ्यासक्रमाकरीता महाज्योती संस्थेकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले.यावेळी खेमेंद्र कटरे यांनीही वसतिगृहाकरीताच्या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले.त्यांनतर ही यात्रा ठाणेगावकडे रवाना झाली.

blank