33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ बाहेकर व्यसनमुक्ति केंद्रात स्वतंत्रता दिवस उत्साहात

बाहेकर व्यसनमुक्ति केंद्रात स्वतंत्रता दिवस उत्साहात

0
15

blank

गोंदिया,दि.१६ः-१५ आगस्त २०२५ ला देशाच्या ७९ वें स्वतंत्रता दिवसाच्या पावन पर्वावर डॉ. बाबासाहेब अम्बेडकर दलित मित्र पुरस्काराणे सम्मानित श्री गणेश ग्रामीण विकास शिक्षण संस्थान गोंदिया द्वारा संचालित बाहेकरजी व्यसन मुक्ति केंद्र आमगाव जिल्हा गोंदिया मध्ये स्वतंत्रता दिवस साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संभूदयाल अग्रीका यांच्या अध्यक्षता मध्ये भारत माताच्या  प्रतिमेला  पूजन व माल्यार्पण करुण कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली.ध्वजारोहण सागर चव्हाण  PSI आमगाव  पोलीस स्टेशन  यांच्या हस्ते पार पडले.प्रमुख अतिथि मध्ये संजय बाहेकर तालुका कॉंग्रेश अध्यक्ष आमगाव, राजेश भाक्तवर्ती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ,मा.मुनेश्वर,पो.हवालदार आमगाव,श्री कुलदीप हे उपस्थित होते. सागर चव्हाण PSI यांनी लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हटले की व्यसनाचे गुलाम न बनता एक चागले व्यक्ति बना ज्यामुळे तुमचे जीवनमान सुधारेल आनी तुम्हाला एक चागले जीवन जगता येईल असे विचार व्यक्त केले.संजय बाहेकर यांनी म्हटले की स्वतंत्रता देशाच्या महापुरुष यांच्या त्याग, बलिदान व संघर्ष चे प्रतीक आहे  सर्व देशवासियांच्या मनात देशाच्या प्रति समर्पण व प्रेमाची भावना राहली पाहिजे.

स्वतंत्रता दिवसाच्या पर्वावर वृक्ष संवर्धन आनी व्यसनमुक्त समाज निर्माण साठी संकल्प घेण्यात आला व  देशभक्ति गीत सादर करण्यात आले कार्यक्रम चे संचालन ज्योति टेम्भेकर यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रियंका मेश्राम,राहुल हरीनखेडे , मनीषा कावळे प्रदीप पटले, सूरजलाल  चुटे ,पामेश गजभीये ,कटरे, जितेंद्र मेश्राम   व सर्व कर्मचारी यांनी यशस्वीतेकरिता अथक परिश्रम केले.

blank