33.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री भोयर,सावकारेंना हटवले

भंडारा जिल्ह्याचे नवे पालकमंत्री भोयर,सावकारेंना हटवले

0
147

blank

भंडारा,दि.२६ःएैन गणेशोत्सवाच्या पर्वावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा जिल्ह्यातील जातीय समीकरण सांभाळण्याच्या दृष्टीने भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदललल्याचे बोलले जात आहे. संजय सावकारे यांच्या जागी आता गृहराज्यमंत्री पंकज भोयर हे भंडाऱ्याचे नवीन पालकमंत्री असणार आहेत. संजय सावकारे यांचे डिमोशन झाल्याचे कळते, त्यांना आता बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.मागील काही दिवसांपासून संजय सावकारे यांच्यावर भंडाऱ्यात फक्त १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीसारख्या कार्यक्रमांना हजेरी लावण्याचा ठपका ठेवण्यात येत होता. नागरिकांमध्ये स्वतःच्या जिल्ह्यातला किंवा परिसरातील पालकमंत्री असावा अशी मागणी होती.त्यातच शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचे वाढते वलय कमी करण्याकरीता भाजपच्याच एका आमदाराच्या आग्रहाच्या कारणामुळे सावकारे यांची उचलबांगडी झाली असावी अशी चर्चा आहे. नवनियुक्त पालकमंत्री पंकज भोयर हे वर्धा जिल्ह्यातील कुणबी समाजाचे नेते असल्याने, भाजप आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांवर आपली पकड मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला असावा अशीही चर्चा सुरू आहे.

blank