25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ अंगणवाडी सेविका व मदतनिसांची जिल्हा परिषदेवर धडक,सरकारविरोधात दिल्या घोषणा

अंगणवाडी सेविका व मदतनिसांची जिल्हा परिषदेवर धडक,सरकारविरोधात दिल्या घोषणा

0
91

गोंदिया,दि.२९ः महाराष्ट्र राज्य अगनंवाडी बाल कर्मचारी युनियन आयटकच्या वतीने आज दिनांक 29 आॅगष्ट रोजी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आपल्या विविध मागण्यांना घेऊन जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेत सरकारविरोधात घोषणा दिल्या.पतंगा चौकातून निघालेल्या या मोर्च्याचे नेतृत्व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष हौसलाल रहांगडाले, राज्य उपाध्यक्ष आयटक विठा पवार,राज्य सचिव शकुंतला फटिग,जिल्हा अध्यक्ष पोर्णिमा चुटे,जिल्हा सचिव परेश दुरूगवार यांनी केले.मोर्च्याचे सभेत रुपांतर झाल्यानंंतर जिल्हा परिषदेचे महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात अंगणंवाडी सेविका मदतनिस यांना पेन्शन व ग्रॅज्युटी लागू करण्यात यावे,एफआरएस ची शक्ति बंद करण्यात यावे,2024 पासून लागू करण्यात आलेला प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे.मोबाईल सिम कार्ड व रिचार्जचे पैसे देण्यात यावे.चांगल्या दर्जाचे टीएचआर देण्यात यावे.मातृवन्दंनेच्या कामासाठी दबाव आणू नये आदी मागण्यांचा समावेश निवेदनात होता.आंदोलनात जिवनकला वैद्य,बिरजूला तिडके,राजलक्ष्मी हरिणखेडे,अर्चना मेश्राम,शामकला मसराम,काचंन शहारे,अनिता शिवनकर,प्रणिता रंगारी,ज्योति लिल्हारे,लता बरेकर,अनिता झिगरे,अजंना ठाकरे,पुष्पा ठाकूर,विना गौतम,पुष्पा भगत सह शेकडोच्या संख्येत आगणंवाडी सेविका मदतनिस सहभागी झाल्या होत्या.

blank