28.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ खासदार पडोळेंनी घेतला गोरेगाव तालुक्यातील समस्यांचा आढावा

खासदार पडोळेंनी घेतला गोरेगाव तालुक्यातील समस्यांचा आढावा

0
69

गोरेगाव,दि.०१ः जनतेच्या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा आणि जलजीवन मिशनची अपूर्ण कामे या विषयांवर खासदार प्रशांत पडोळे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध सूचनाही देण्यात आल्या.

बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे पूर्ण करणे, नागरिकांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी देणे यावर विशेष भर देण्यात आला. घरकुल, mrgs, कृषी, आरोग्य, शिक्षण याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.जनतेच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणात कोणतीही शिथिलता सहन केली जाणार नाही. गोरेगावचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांच्या सोयी-सुविधा हीच आमची सर्वोच्च प्राधान्यक्रम आहे.गोरेगाव येथील तहसीलदार आणि नगर परिषद सीओ यांनी तात्काळ समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, तसेच जनतेला अनावश्यक त्रास देणे थांबवावे.
बैठकीस माजी आ.दिलिप बनसोड जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी गोंदिया,जगदीश येलोरा ता.अध्यक्ष,टी.बी.कटरे,शशिकांत भगत,पंचायत समिती सदस्य कटरे, सौ.भूमेश्वरीताई राहांगडाले, सरपंच चिचागाव,गोपाल ठाकूर, सौ.स्नेहाताई कोल्हे,विवेक मेंढे, सौ.सुषमाताई तुमसरे सरपंच, गोरेगाव, तहसीलदार, नगर परिषद सीओ तसेच गोरेगाव शहर, आणि ग्रामीण भागातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

blank