24.2 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ ‘अंनिस’ चे दिवाळीला ‘फटाके नको, पुस्तके घ्या’ अभियान- रोशन मडामे

‘अंनिस’ चे दिवाळीला ‘फटाके नको, पुस्तके घ्या’ अभियान- रोशन मडामे

0
39

: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान
गोंदिया: सण-उत्सव आनंदाने साजरा करणे हा भारतीयांचा गुण जगभर प्रसिद्ध आहे, मात्र आज सण साजरा करतानाा पर्यावरणाचा ह्रास होत आहे हे त्यांचा लक्षात येत नाही. दिवाळी हा आनंद साजरा करण्याचा सण, पण ही दिवाळी फटाके फोडून साजरी करताना आपण न कळत पर्यावरणाचे नुकसान करतो. अपघाताला निमंत्रण देतो हे लक्षात येत नाही. फटाक्यांचे दुष्परिणाम लक्षात घेता ही दिवाळी फटाकेमुक्त दिवळी साजरी करून अपघात व प्रदूषणमुक्त आनंद साजरा करा, असे आवाहन अनिल गोंडाने यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली 18 वर्षापासून प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी फटाकेमुक्त दिवाळी उपक्रम शाळा-महाविद्यालय येथे महाराष्ट्रभर राबविते. याहीवर्षी गोंदिया जिल्हा व शहर शाखा वतीने फटाकेमुक्त दिवाळी अभियानाची सुरूवात शहरातील संस्थागार येथे दिनांक 17/10/2025 ला श्री रोशन मडामे यांचा मार्गदर्शन मोहिमेची सुरूवात करण्यात आली. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष अनिल गोंडाने, प्राचार्य यादवराव बोरकर, डी.डी. मेश्राम, देवचंद वॅद्ये,नरेंद्र भोंडेकर,राजेंद्र मेश्राम,शैलेंद्र गडपायले,नंदकिषोर गणवीर,राजा बाबा वासनीक,गौतम गजभिये, एकनाथ शेंडे,सिध्दार्थ बंसोड,रवी शेंडे,नितीन गजभिये, आदींची प्रमुख उपस्थिती होती. फटाक्यांना खर्च होणारी रक्कम टाळून ती पुस्तके खरेदी करण्यासाठी मुलांनी वापरावी, यासाठी ‘फटाके नको, पुस्तके घ्या’ उपक्रम अंनिसकडून राबविला जात आहे. यासाठी विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांनाही याबाबतीत पुढाकार घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे.
मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, जाणिवा प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने अंनिसने यंदा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विषयावर बाल साहित्यांची निर्मिती केली आहे. यामध्ये रंगीत व चित्रमय पद्धतीने पाच पुस्तके काढण्यात आली आहेत. पुस्तके ना नफा ना तोटा तत्त्वावर विद्यार्थ्यांसाठी रु.५० ला एक पुस्तक याप्रमाणे विक्री केली जात. ही पुस्तके घेण्याबरोबर यंदा दिवाळी फटाकेमुक्त, प्रदूषणमुक्त साजरी करावी तसेच फटाक्यांवर होणारा खर्च टाळून पुस्तके खरेदी करावी. असे आवाहन अंनिसचे कार्यकर्ते अनिल गोंडाने यांनी केले आहे.

blank