23.3 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home Top News विरोधी पक्षांच्या खासदारांची केंद्र सरकारविरोधात निदर्शने ; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

विरोधी पक्षांच्या खासदारांची केंद्र सरकारविरोधात निदर्शने ; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

0
6

नवी दिल्ली : NEET पेपरफुटीप्रकरणी आणि दिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या मुद्द्यावरून काँग्रेसने  संसदेत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकरणावर तातडीने चर्चा व्हावी, अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत गोंधळ घातला. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी NEET मधील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थी आंदोलनावरील पोलीस कारवाईचा मुद्दा उचलून धरत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची हाताळणी करण्यात मोदी सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार निदर्शने केली. विरोधी पक्षांच्या खासदारांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही निशाणा साधत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे देशभरात असंतोष वाढल्याचा आरोप विरोधकांनी केला.

या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवला. विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी सरकारने त्यांच्याशी संवाद साधून तोडगा काढायला हवं होतं, अशी मागणीही करण्यात आली.विरोधकांचे म्हणणे आहे की, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित इतक्या गंभीर विषयावर सरकारने संवेदनशीलता दाखवणे आवश्यक होते. मात्र, त्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

blank