क्षयरोग कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध बाबीवर अर्धा तास चर्चा
गोंदिया,दि.24 -जिनेव्हा स्वित्झरलँड येथील “स्टॉप टिबी“चे डॉ.रॉबर्ट स्टीफन तसेच आशाकल्प प्रकल्प डायरेक्टर दीपक जोशी हे गोंदिया जिल्हा दौर्यावर आले असुन जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्था,गावपातळीवरील रुग्ण,आरोग्य कर्मचारी व पदाधिकारी यांचेशी संवाद साधुन क्षयरोग कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीकोनातुन कामकाजाची पाहणी करित आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील ग्रामपंचायत धानोरी,प्राथमिक आरोग्य केंद्र पांढरी अंतर्गत आयुष्मान आरोग्य मंदीर मालीजुंगा व ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे भेटी देवुन जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग कार्यक्रम कामकाजाची पाहणी केली.ग्रामपंचायत धानोरी येथे निक्षय शिबीरादरम्यान मोफत एक्स-रे शिबीर आयोजित केले होते त्याची पाहणी केली.सरपंच चेतनबाई पटले यांचेशी संवाद साधुन कार्यक्षेत्रात असलेल्या क्षयरोगी रुग्णांना दिल्या जात असलेले उपचार बाबत माहीती जाणुन घेतली.दुपारसत्रात ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे भेट देवून प्रयोग शाळेतील उपलब्ध सिबीनेट व ट्रुनेट अत्याधुनिक मशिनरीची पाहणी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत कार्यक्रम अंतर्गत भारतास जिनेव्हा स्वित्झरलँड येथील “स्टॉप टिबी” व “आशाकल्प “प्रकल्प हे दोन्ही एनजीओ मार्फत अर्थसहाय्य दिल्या जात आहे.सदर अर्थसहाय्य कार्यक्रमाचा उद्देश 2030 पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करणे आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांचेशी आरोग्य विभागातील त्यांचे दालनात भेट घेऊन क्षयरोग कामकाजाची चर्चा केली.
यावेळी क्षयरुग्णांचे वेळेवर निदान करणे आणि त्यांना दर्जेदार औषधे व उपचार देणे.क्षयरोग उपचारादरम्यान रुग्णाला पूर्णपणे सहाय्य करणे, जेणेकरून उपचार यशस्वी होईल. क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करणे, सहव्याधी लोकसंख्येमध्ये विशेष लक्ष देवुन जास्त धोका असलेल्या लोकांमध्ये क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी केली जाणे.सरकारी आरोग्य केंद्रांवर क्षयरोगाचे निदान करण्यासाठी थुंकी तपासणी आणि जलद आण्विक चाचण्या त्यात सिबीनेट व ट्रुनेट अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने प्रयोगशाळेत विनामूल्य चाचण्या उपलब्ध करणे.जास्त धोका असलेल्या लोकसंख्येमध्ये(उदा.मधुमेही,एच.
सदर भेटी दरम्यान आरोग्य विभागाचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे,जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.निरजंन अग्रवाल,क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे,आयईसी विभागाचे प्रशांत खरात,जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक अर्चना वानखेडे उपस्थित होते.





