28.9 C
Gondiā
Monday, July 27, 2026
Home Top News जंतर मंतरवर जाणार्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ आणि मारहाण, सत्यम पंडित याच्या अटकेची मागणी...

जंतर मंतरवर जाणार्या विद्यार्थ्यांना शिवीगाळ आणि मारहाण, सत्यम पंडित याच्या अटकेची मागणी तीव्र

0
31
नवी दिल्ली/वृत्तसेवा=दिल्लीतील जंतर मंतर येथील विद्यार्थी आंदोलनात सामील होण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांना मध्येच थांबवून, शिवीगाळ करून आणि कानशिलात मारल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. गाझियाबादचा स्वयंघोषित नेता आणि राष्ट्रीय वीर हिंदू सेनेचा अध्यक्ष सत्यम पंडित याच्यावर या हल्ल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी तीव्र झाली आहे.
आरोपी सत्यम पंडितने जंतर मंतरवर विद्याथ्र्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जाणार्या दोन विद्यार्थ्यांना थांबवून त्यांची नावे, धर्म आणि ओळख विचारली. त्यानंतर त्याने कॅमेर्यासमोरच त्यांना शिवीगाळ केली आणि कानशिलात मारून माफी मागण्यास भाग पाडले. धक्कादायक बाब म्हणजे, सत्यम पंडितने स्वतःच आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम अकाउंटवर या हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि जंतर मंतरला गेलो आणि काही झुरळांना धडा शिकवला, ते काहीही म्हणोत, ते दाखवून देतील.
बरेलीचा रहिवासी असलेला आयुष रंजन, त्याचा मित्र राहुलसोबत दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात जात होता. विद्यार्थ्याने सांगितले की पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास सत्यम पंडितने त्याच्या मित्रांसोबत गाडी अडवली आणि आंदोलनाला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावर सपाचे प्रमुख अखिलेश यादव, टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी व्हिडिओ शेअर करून दिल्ली पोलीस आणि प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली.
अखिलेश यादव म्हणाले कि बघा भाजप आणि त्याचे साथीदार लोकांसोबत कसा दुरव्र्यवहार करतात. भाजपवर टीका करताना ते म्हणाले कि भाजप म्हणजे विश्वासाच्या अगदी विरुद्ध आहे. दरम्यान, महुआ मोइत्रा यांनी सत्यम पंडित यांना पशू म्हटले आणि दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा अशी मागणी केली. त्या म्हणाल्या की ते स्वतः एफआयआर दाखल करू शकतात.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर निषेध आणि एफआयआर दाखल करण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, सत्यम पंडितने माध्यमांना सांगितले की त्याला आपल्या कृत्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही आणि तो एफआयआर दाखल करण्यास तयार आहे.
गाझियाबादचा रहिवासी असलेला सत्यम पंडित, कायदा हातात घेतल्यामुळे आणि विविध वादांमुळे अनेकदा चर्चेत राहिला आहे. आॅगस्ट 2024 मध्ये मुसलमानाविरोधात प्रक्षोभक भाषणे दिल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली होती. फेबु्रवारी 2026 मध्ये मांसाची दुकाने जबरदस्तीने बंद केल्याबद्दल आणि दुकानदारांना मारहाण केल्याबद्दल गाझियाबाद पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. सत्यम पंडित नेहमी मुस्लिमांना टारगेट करतो. त्याने एक अन्य व्हिडिओ शेअर केल्या आहे, ज्यामध्ये कावड यात्रेत मुस्लिम पोलिस कर्मचार्यांची ड्यूटी न लावण्याची मागणी केली आहे.

blank