38.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ गोरेगाव तहसिल कार्यालय वाऱ्यांवर,सुट्टी न घेता अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारली बुट्टी

गोरेगाव तहसिल कार्यालय वाऱ्यांवर,सुट्टी न घेता अधिकारी कर्मचाऱ्यांनी मारली बुट्टी

0
348

blank

गोरेगाव तहसील कार्यालयात शांतता, अधिकाऱ्यांसह कर्मचारी कामकाजाच्या दिवशीही बेपत्ता
रिकामी खुर्ची पाहून नागरिकांना कोणतेही काम न करता घरी परतावे लागत आहे.

गोंदिया,दि.२४ःदिवाळीच्या निमित्ताने राज्यसरकारी कर्मचार्यांना भाऊबिजेपर्यंत सुट्या शासनाने दिलेल्या होत्या.त्यानंतर २४ ऑक्टोबरपासून कार्यालयीन कामकाज सुरु झाले.यात एक दिवस कार्यालयाचा असल्याने अनेक अधिकारी व कर्मचारी यांनी रजेचा अर्ज घालून सुट्टीचा आनंद घेतला.मात्र काही अधिकारी कर्मचारी यांनी रजेचा अर्ज न घालतचा सुट्टी घेत कार्यालयाला बुट्टी मारल्याचा प्रकार बघावयास मिळाला.जिल्ह्यातील गोरेगाव तहसिल कार्यालय तसे नेहमी चर्चेत असते,येथील तहसिलदार या गोरेगाव या मुख्यालयी न राहता त्या गोंदियावरुन ये-जा करतात.त्यांनी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकृत रजेचा अर्ज घालत सुट्टी घेतली.परंतु गोरेगाव तहसिल कार्यालयातील इतर नायब तहसिलदार व वरिष्ठ कर्मचार्यानी कुठलीही सुट्टी न घेता आज २४ ऑक्टोबरला शासकीय कार्यालयाला बुट्टी मारल्याचे दिसून आले. रजा न घेतलेले नायब तहसीलदार व प्रमुख विभागातील वरिष्ठ कर्मचारीही गैरहजर असल्याने कार्यालयातील खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. म्हणजेच तहसील कार्यालयात शांतता होती. अनेक नागरिकांना कामाविना परतावे लागले. आता अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जिल्हा प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.blank
दिवाळीनिमित्त सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 21 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंत सुट्टी देण्यात आली होती. 20 ऑक्टोबरच्या दुपारनंतर काही अधिकारी निघून गेले होते. भाऊबिजेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार २४ ऑक्टोबरपासून कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र बहुतांश अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचलेच नाहीत.अधिक माहिती घेतले असता तहसीलदार रजेवर असल्याचे सांगण्यात आले. मात्र इतर नायब तहसीलदार व कर्मचारी कार्यालयीन कामावर असल्याचे सांगितले गेले.परंतु वास्तविक चित्र बघितल्यास चार नायब तहसीलदार, आस्थापना विभागाचे अधिकारी, महसूल कर्मचारी यांच्याशिवाय नाझर अधिकारीही कार्यालयात गैरहजर दिसून आले.

blank