
गोरेगाव,दि.०१ः जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासदार प्रफुल पटेल हे सैदव कटिबद्ध असून या विकासाच्या शृखंलेत गोरेगाव शहरात विविध विकास कामे मंजूर करण्यात आली. गोरेगांव नगरवासीयांच्या मूलभूत समस्या लक्षात घेवून नागरी सेवा व सुविधा पुरविणे या योजने अंतर्गत मंजूर विकास कामांचे भूमिपूजन माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले.यादरम्यान माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोरेगाव वासियांच्या समस्या मार्गी लावण्यात व शहराला विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून आम्ही व राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते नेहमीच तत्पर राहू याची ग्वाही त्यांनी दिली.
विकास कामांचा समावेश
गोरेगांव शहरातील दुर्गा मंदिर परिसरात सभागृह बांधकाम, श्री राधाकृष्ण मंदिर परिसरात सभागृह बांधकाम, प्रभाग २ मध्ये पोवार समाज मंदिर आवारभिंत बांधकाम, प्रभाग ३ मध्ये छगन भंडारी ते तेजराम अंबुले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम, प्रभाग १३ मध्ये मनोज चौधरी ते बाजार पाणी टाकी पर्यंत रस्ता बांधकाम, प्रभाग १६ मध्ये हिदायत शेख ते उपरीकर गुरुजी यांच्या घरापर्यंत सिमेंट बंदिस्त नाली बांधकाम व हिदायत शेख चूलपार मॅडम यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी सर्वश्री राजेंद जैन, केवलभाऊ बघेले, कृष्णकुमार बिसेन, दि. दा. येळे, रामभाऊ हरिनखेडे, श्रीप्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, आर. डी. कटरे, रामभाऊ अगडे, श्रद्धाताई रहांगडाले, प्रमोद जैन, अनिताताई तुरकर, उषाताई रामटेके, राजुभाऊ पारधी, कल्पनाताई शेवटे, रंजूताई अगडे, सुषमाताई अगडे, जी. एस. शेवटे, मनीष धमगाये, नितेश येल्ले, अमन कटरे, बी. आर. गौतम, खुशाल वैद्य, घनेश्वर तिरले, प्रतीक पारधी, सुनील कापसे, अनिल मडावी, राजू अगडे, शिला पारधी, कैलास वाघाडे, भुनेश्वर किरसान, धनराज रामटेके, शाम भलावी, भुमेश गौतम, दिशाताई रहांगडाले, निशाताई बीजेवार, अर्चना चौधरी, मजुमदार मॅडम, रेखाताई ठाकूर, उषा रहांगडाले, प्रीती चौहान, रोशनी निनावे, विजयाताई मानकर, मायाताई पिपलेवार, सरिताताई चौहान, चूलपार मॅडम, शुभम रामटेके, हेतराम बोपचे, बी. बी. चौधरी, सतीश हुमने, महेंद्र चौधरी, राहुल रहांगडाले, राहुल कुरेशी, विनोद रहांगडाले, पंचकुला भंडारी, योगेश चौधरी, द्वारकाताई भोयर, सेवकराम डिब्बे, सहित मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.





