35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय शिक्षकांचा प्रतिनिधी सभागृहात पाठवा – आमदार सुधाकर अडबाले

शिक्षकांचा प्रतिनिधी सभागृहात पाठवा – आमदार सुधाकर अडबाले

0
37

blank

अमरावती येथे शिक्षक नोंदणी आढावा सभा

वाशीम : “शिक्षकांचे प्रश्न खऱ्या अर्थाने सोडवायचे असतील आणि शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांगीण प्रगती घडवायची असेल, तर शिक्षक प्रतिनिधींनाच विधिमंडळाच्या सभागृहात पाठवणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार तथा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आ. सुधाकर अडबाले यांनी केले.
येत्या काळात विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ द्वारे आयोजित अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक २०२६ साठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अधिकृत, राज्‍य शिक्षक संघाचे पुरस्‍कृत व म.रा. आय.टी.आय. निदेशक संघटनेचे समर्थित उमेदवार दिलीप भिमरावजी कडू यांचा निवडणूक प्रचार शुभारंभ व शिक्षक मतदार नोंदणी आढावा सभा विमलाबाई देशमुख सभागृह, शिवाजी शिक्षण संस्‍था कार्यालयाच्या समोर, अमरावती येथे मोठ्या उत्साहात पार पडली.

अंबादेवी मंदिर, अमरावती येथून अंबादेवीचे दर्शन व आरती करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सभा पार पडली.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विमाशी संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले, अध्यक्षस्थानी माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे, उमेदवार दिलीप कडू, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय उपाध्यक्ष विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह बाळासाहेब गोटे, राज्य शिक्षक संघाचे सरचिटणीस भोजराज काळे, अध्यक्ष अनिल भारसाकळे, राम बारोटे, मेस्टा संघटनेचे संदीप गावंडे, प्रशांत लांडे, अनिल आसलकर, एम.सी.व्ही.सी संघटनेचे सुधीर ठवळी, विलास रोडे, मधुकर रोडे, प्रदीप थोरात, विमाशि संघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ रस्से, अतुल देशमुख, पवन बन, विष्णू अवचार, जिल्हा कार्यवाह आशिष इंगळे, अरविंद चौधरी, रामकृष्ण जीवतोडे, नितीन गायकवाड, वसंता माळी, सतीश शेळके, वर्धा जिल्हा कार्यवाह महेंद्र सालंकार, विनायक उज्जैनकर, डॉ. इशरत जबिन, वजाहत अली गाजी व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, राज्य शिक्षक संघ व समविचारी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले की, “शिक्षक समाज हा समाजातील सर्वात जागरूक घटक आहे. त्यांच्या अडचणी, सेवा विषयक समस्या व शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक प्रश्न केवळ शिक्षक प्रतिनिधीच परिणामकारकपणे सभागृहात मांडू शकतात. त्यामुळे सर्व शिक्षकांनी सजग राहून सक्षम उमेदवाराला पाठिंबा द्यावा. आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित शिक्षकांना राज्यातील शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत समस्यांवर मार्गदर्शन केले. अमरावती विभागात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे अधिकृत व अनेक संघटनेने पाठिंबा दिलेले उमेदवार दिलीप कडू यांना निवडून आणण्याचे आवाहन आमदार सुधाकर अडबाले व माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी उपस्थित शिक्षक, पदाधिकारी व सदस्यांना केले.

उमेदवार दिलीप कडू यांना सभेत एम.सी.व्ही.सी संघटनेने पाठिंबा दिला. सभेनंतर उमेदवार दिलीप कडू यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.सभेचे संचालन श्रीकांत लाजुरकर यांनी तर आभार प्रदीप नानोटे यांनी मानले. बैठकीला संघाचे पदाधिकारी, शिक्षक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

blank