37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष कोठेवार यांचा भाजपात प्रवेश,नगराध्यक्ष पदाची लढणार निवडणूक

युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष कोठेवार यांचा भाजपात प्रवेश,नगराध्यक्ष पदाची लढणार निवडणूक

0
318

blank

गोंदिया,दि.१३- जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांना हळूहळू राजकीय रंग चढू लागला असून गोरेगाव येथे प्रदेश युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष अजय कोठेवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात कोठेवार यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात केल्याने राजकीय खळबळ उडाली आहे.कोठेवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्ष सीता रहागंडाले,आमदार विजय रहागंडाले,संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर,जि.प.सभापती डाॅ.लक्ष्मण भगत, माजी आमदार खोमेशभाऊ रहागंडाले,माजी आमदार हेमंत पटले,माजी जि.प.अध्यक्ष पकंज रहागंडाले,माजी नगराध्यक्ष इंजि.आशिष बारेवार यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये आपल्या कार्यकर्त्यासंह प्रवेश केला.भाजपने कोठेवार यांना गोरेगाव नगरपंचायतीचे अध्यक्ष पदाचे उमेदवार जाहिर केले आहे.कोठेवार यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

blank