41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home राजकीय काँग्रेसचे सचिन शेंडेनी शक्तिप्रदर्शन करीत दाखल केले उमेदवारी अर्ज

काँग्रेसचे सचिन शेंडेनी शक्तिप्रदर्शन करीत दाखल केले उमेदवारी अर्ज

0
138

blank

गोंदिया- नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या सोमवारी (ता. १७) शेवटच्या दिवशी प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत आपापले नामांकन अर्ज दाखल केले. गोंदिया नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे तिकीट कोणता पक्ष कोणाला देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर रविवारी (ता. १६) रात्री उशिरापर्यंत पक्षांनी आपापले उमेदवार ठरविले.गोंदियात महाविकास आघाडी(काँग्रस,उबाठा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) एकत्रित तर निवडणुक लढत असून महायुतीतील तिन्ही पक्ष स्वतंत्र निवडणुक रिंगणात आहेत.
काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन गोविंद शेंडे यांनी मरारटोली येथून मिरवणुक काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज सादर केला.त्यांच्यासोबत काँग्रेसचे युवा नेते प्रफुल अग्रवाल,महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना काळे,जितेश राणे,अशोक गुप्ता, माजी नगरसेवक राकेश ठाकुर,शहर अध्यक्ष अशोक चौधरी,सुरेश चौरागडे,शकिल मंसुरी,देवा रुसे आदी उपस्थित होते.

blank