34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचं-खासदार प्रफुल पटेल

राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचं-खासदार प्रफुल पटेल

0
68

blank

गोंदिया : आज नगर परिषद करिता राज्यात मतदान होत असतानाच मतमोजणी न्यायालयामुळे पुढे गेली हे समजलं. पण अशा प्रकारे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचं असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले आहे.
खासदार पटेल हे आज २ डिसेंबर रोजी गोंदिया नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मधील नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील मतदान केंद्रावर आपला मतदानाच्या हक्क बजावना करिता आले असता खा. पटेल माध्यमानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते.

पुढे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका लांबणीवर टाकल्या हे बरोबर नाही गोंदिया नगरपरिषद निवडणूक मतदानासाठी खासदार प्रफुल पटेल आले असता त्यांनी पत्नी वर्षा पटेलसह मतदान केले आणि सांगितले की मतदान सर्वांच्या लोकशाहीमध्ये मिळालेला अधिकार आहे. सामान्य नागरिकांनी सुद्धा आपला मतदान हक्काचा अवश्य वापर करावा. यामुळे आपली लोकशाही मजबूत होते. मी सुद्धा दिल्ली येथे काल सोमवार १ डिसेंबर पासून सुरू झालेल्या संसदेचे हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली आणि आज मंगळवार २ डिसेंबर रोजी गोंदिया नगर परिषद निवडणूक करिता मतदान करायला सहकुटुंब आलेलो आहे आणि नंतर आजच दिल्ली पुन्हा परत जाणार आहे.
मतमोजणी पुढे ढकलण्यात आली आहे यावर प्रफुल पटेल म्हणाले की यात मूळ समस्या ही आहे की राज्य निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका काही वार्डातल्या पुढे ढकलले आहेत. त्या योग्य नसल्याचा त्यांनी सांगितले. हेच चुकीचे आहे. निवडणुकीची सर्व प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असताना अचानक उमेदवारांच्या अपील वर सुनावणी आणि यामुळे निवडणुकीला विलंब होणे हे योग्य नाही. असे म्हणत त्यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर नाराजगी व्यक्त केली. तसेच राज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये कुठे युती करून तर कुठे अमोरासमोर वेगवेगळे लढत असलो तरी राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

blank