39.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ संगणक परिचालकांचे राज्यभर बेमुदत ‘काम बंद आंदोलन

संगणक परिचालकांचे राज्यभर बेमुदत ‘काम बंद आंदोलन

0
124

blank

दरमहा मिळते केवळ तुटपुंजे मानधन : ग्रामपंचायतीच्या डिजिटल सेवेला फटका
चित्रा कापसे/तिरोडा-ग्रामपंचायत स्तरावर मागील १४ वर्षांपासून ग्रामीण भागातील नागरिकांना विविध डिजिटल सेवा उपलब्ध करून देणाऱ्या संगणक परिचालकांनी मंगळवारपासून राज्यभर बेमुदत ‘काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मांगिल चार महिन्यांचे मानधन थकीत असणे, कोरोना काळातील विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता न मिळणे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात हे आंदोलन आहे.

ग्रामपंचायतींचे ऑनलाईन ऑफलाईन कामकाज, जन्म-मृत्यू दाखले, विवाह प्रमाणपत्र देणे, यासारखी महत्त्वाची व तांत्रिक कामे ते सातत्याने आणि प्रामाणिकपणे करत आहेत तसेच शासनाच्या विविध महत्वकांक्षी योजना जनतेपर्यत पोहोचवण्याचे काम ते करत आहेत. आयूष्मान भारत, स्वच्छ भारत मिशन, घरकुल आवास योजना अशा अनेक विविध महत्वपूर्ण योजना राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांना केवळ ९ हजार ९०० रुपये मानधन मिळते. महागाईच्या काळात मानधन तुटपुंजे रक्कम असल्याची खंत संगणक परिचालकांनी व्यक्त केली. त्यातही मानधन वेळेवर न मिळाल्याने परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मान्य झालेल्या ३ हजार ३०० पगारवाढीची तत्काळ अंमलबजावणी करावी, कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या परिचालकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांचे विमा कवच, तसेच कोरोनाकाळात जीवाची बाजी लाऊन केलेल्या कामासाठी २३ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी त्यांनी केली.
केली आहे. याशिवाय, संगणक परिचालकांना ‘ग्रामपंचायत सहाय्यक’ असा शासकीय किंवा निमशासकीय दर्जा द्यावा, तोपर्यंत किमान वेतन कायदा लागू करावा. आदी मागण्यांचे निवेदन गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे यांना देण्यात आले.यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष कमलेश अनवादे, उपाध्यक्ष वैशाली तिडके, सचिव कैलास केवट, ज्योत्स्ना बोरकर, उमेश मेश्राम, युगेश्वरी पटले, प्रकाश पटले, रीना राऊत, दिनेश पटले, संतोष कळवं, दिपीका साकुरे, नेहा पटले, आदींची उपस्थिती होती.

blank