34.4 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ वकृत्व स्पर्धेतून श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांनी...

वकृत्व स्पर्धेतून श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांचा गौरवशाली इतिहास विद्यार्थ्यांनी जागा केला

0
18

blank

गोंदिया, दि.5 : लिटिल वूड्स इंटरनॅशनल शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वकृत्व स्पर्धेतून श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांचा गौरवशाली इतिहास जागा केला.
शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांचा 350 वा शहीदी समागम निमित्त येथील लिटिल वूड्स इंटरनॅशनल शाळेमध्ये श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांचावर आधारित वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पाचव्या ते नवव्या वर्गापर्यंत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले नाव नोंदवले आणि श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांच्यावर आधारित आपले वक्तृत्व पाहुण्यांसमोर सादर केले.
या वक्तृत्व स्पर्धेत पाहुणे तसेच जज म्हणून जिल्हा माहिती कार्यालयाच्या जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर, उपसंपादक कैलाश गजभिये आणि अजित सिंह जुनेजा, दलजीत सिंग खालसा, शाळेचे संचालक आशिष जयस्वाल उपस्थित होते.
स्पर्धेत जवळपास 50 विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि हिंदी मध्ये आपले मनोगत व्यक्त केले. या मनोगतात ‘ वाय गुरुजी दा खालसा वाय गुरुजी दी फतेह’ असे अभिवादन करून पाहुण्यांचे मने जिंकली. तर ‘ जो बोले सो निहाल सत सीयकाल’ असे म्हणून श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांच्या काळातील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादुर हे नाव कसे पडले, त्यांनी धर्मरक्षणासाठी सर्व समर्पण केले, सिख धर्मातील समानतेबद्दलची माहिती दिली.
सातवी ते नववी विद्यार्थ्यांच्या मधील झालेल्या स्पर्धेत नवव्या वर्गातील गार्गी रहांगडले या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळविले तर सातव्या वर्गातील दिया चंदवाणी हिला दुसरे पारितोषिक मिळाले. सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये काव्या नोटांनी या दिव्यांग विद्यार्थिनीने अतिशय उत्कृष्ट वकृत्व सादर करत पहिला क्रमांक पटकावला तर वेदांशी मस्के हिच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे तिला दुसरा क्रमांक मिळाला. पाचव्या वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये चाहत गोपलानी या चिमुकलेला पहिला क्रमांक पटकावला तर भाविका ठकरांनी या विद्यार्थिनीने दुसरा क्रमांक मिळविला. वकृत्व स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षिका ऋतुराज कौर मठारू यांनी विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतली.
श्री गुरु तेग बहादुर साहब जी यांच्यावर आधारित वकृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांनी सिख समाजातील नवव्या गुरूंचा इतिहास आणि त्यांची शौर्यगाथा समजण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शासनाच्यावतीने येत्या रविवारी 7 डिसेंबर रोजी नागपूर येथे यानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करीत आहे. ही वकृत्व स्पर्धा याच कार्यक्रमाचा एक भाग होती.

blank