40 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home राजकीय ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

ज्येष्ठ काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचे निधन

0
26

मुंबई:-राज्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी व जेष्ठ काँग्रेस नेत्या, माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं मुंबईत निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी शालिनीताई पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. त्या माहिममधे राहत होत्या. राहत्या घरीच त्यांचं निधन झालं आहे. साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.