26.3 C
Gondiā
Friday, August 28, 2026
Home विदर्भ करिनाच्या मृत्यूप्रकरणी संस्थेवर कारवाई करा-कोरेटी

करिनाच्या मृत्यूप्रकरणी संस्थेवर कारवाई करा-कोरेटी

0
19

देवरी ,दि.23: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणार्‍या सडक-अर्जुनी तालुक्यातील कोकणा येथील श्रीकृष्ण अवधूत आदिवासी अनुदानीत आश्रमशाळेतील ४ थ्या वर्गात शिकत असलेली करिना सुकलाल उईके हिचा रविवारी (दि.१८) सकाळी ११ वाजता मृत्यू झाला. तिचा मृत्यू आश्रमशाळेतील कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षामुळे झाल्याचा आरोप मृत् विद्यार्थिनीचे वडील सुकलाल उईके यांनी केला असून या संबंधात प्रकल्प अधिकारी जितेंद्र चौधरी यांना सोमवारी (दि.१९) निवेदन देऊन योग्य चौकशीची मागणी केली आहे. तर या प्रकरणी संबंधीत आश्रमशाळेच्या व्यवस्थापक मंडळाची चौकशी करून त्वरीत कारवाई करण्याची मागणी जिल्हा काँग्रेसचे महासचिव सहषराम कोरोटी यांनी केली आहे.