धोकादायक ब्रिटिशकालिन इमारतीत विद्यार्थी घेतात शिक्षण!

0
7

अकोला, दि. 23 – जिल्हा प्रशासन प्रशिक्षण संस्था(डीएड)ची प्रशस्त इमारत ब्रिटिशांनी बांधली असून, या इमारतीला अंदाजे दीडशे वर्ष पूर्ण झाले असून, इमारत ठिकठिकाणी जीर्ण झाली आहे. भिंतींना, छताला तडे गेलेले आहेत. इमारतीचा अर्ध्या भागाची पडझड झाली असून, अर्धी इमारत शाबूत आहे. या शाबूत इमारतीमध्ये डीटीएडचे विद्यार्थी शिक्षण घेतात. जीर्ण आणि पडझड झालेल्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांसोबतच येथील शिक्षकांचे जीवन धोक्यात आले आहे. नवीन इमारत बांधण्यासंबधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. इमारत शिकस्त आणि जीण झाली असल्याचे पत्र प्रशासनाला वर्षभरापूर्वीच ब्रिटिशांनी इंग्लंडहून पाठविले. परंतु त्या पत्राची अद्यापपर्यंत प्रशासनाने दखल घेतल्याचे दिसून येत नाही.