*नागपूर, दि.१५*: विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज नागपूर महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला.
श्रीमती बिदरी यांनी प्रभाग क्रमांक १४ करिता रविनगर भागातील दादाजी धुनीवाले शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. डॉ. इटनकर यांनी प्रभाग क्रमांक १४ करिता पत्नी डॉ. शालिनी इटनकर यांच्यासह रविनगर भागातील सराव प्रशिक्षण संस्थेच्या आदर्श मतदान केंद्रावर मतदान केले.
००००००




