26.1 C
Gondiā
Wednesday, September 16, 2026
Home विदर्भ गडचिरोली न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून आंदोलन

गडचिरोली न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा काळ्या फिती लावून आंदोलन

0
43

; ‘समान काम, समान वेतन’च्या मागणीसाठी पहिल्या टप्प्यातील आंदोलन

गडचिरोली,दि.१६ सप्टेंबर -उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील अधीनस्थ न्यायालयातील कर्मचाऱ्यांना ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वावर वेतन मिळावे, या प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्र न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या आवाहनावरून आज गडचिरोली जिल्ह्यात आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली.

राज्यभरासह गडचिरोली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमधील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आज दिनांक १६ सप्टेंबर २०२६ रोजी काळ्या फिती लावून आपले कार्यालयीन व न्यायालयीन कामकाज पार पाडत शासनाच्या विरोधात शांततामय पद्धतीने निषेध नोंदविला. कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन हा निषेध व्यक्त करण्यात आला.शासनाने मागणी पूर्ण न केल्यास आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात दि. १६ ऑक्टोबर व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुन्हा काळ्या फिती लावून कामकाज करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने देण्यात आला आहे.

न्यायालयीन व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक असलेल्या कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाप्रमाणे वेतन मिळावे यासाठी उच्च न्यायालयाकडून शासनाकडे पाठविण्यात आलेला प्रस्ताव दि. ३१/०१/२०२५ पासून प्रलंबित आहे. या मागणीकडे शासनाचे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी महासंघाने टप्प्याटप्प्याने आंदोलनाची रूपरेषा निश्चित केली आहे.शासनाने मागणीचा सकारात्मक विचार करून ती लवकरात लवकर मार्गी लावावी, अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.