37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ एशियन वॉटरबर्ड सेन्सस 2026 अंतर्गत भुराटोला डॅम येथे पाणपक्षी निरीक्षण कार्यक्रम

एशियन वॉटरबर्ड सेन्सस 2026 अंतर्गत भुराटोला डॅम येथे पाणपक्षी निरीक्षण कार्यक्रम

0
43

blank

चित्रा कापसे/तिरोडा-उपवनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव– नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांच्याकडील पत्र तसेच विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, गोंदिया यांच्या पत्राच्या अनुषंगाने एशियन वॉटरबर्ड सेन्सस 2026 अंतर्गत सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तिरोडा यांच्याकडून नियोजन करण्यात आले होते.
सदर नियोजनानुसार भुराटोला डॅम (चंदन तलाव) येथे तसेच  चोरखमारा तलाव येथे पाणपक्षी निरीक्षण करून आवश्यक त्या नोंदी नोंदी घेण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी एस. के. आकरे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनीकरण, तिरोडा, अशासकीय सदस्य व पक्षी तज्ञ गौरव बेलगे, जिल्हा परिषद हायस्कूल करटी (बु.) येथील मुख्याध्यापक डी. व्ही. कव्हाणे, तसेच इतर अध्यापक व ६० विद्यार्थी, मानवता हायस्कूल, बेरडीपार (काचेवाणी) येथील अध्यापक व ६० विद्यार्थी, सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तिरोडा येथील एम. आर. येटरे (वनपाल), पी. एफ. (वनपाल) व एच. जी. पटले (वनरक्षक) उपस्थित होते.
विद्यार्थी, अध्यापक व कर्मचाऱ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी श्री आकरे व पक्षी तज्ञ श्री बेलगे यांच्याकडून पक्ष्यांचे स्थलांतर, पक्षी स्थलांतर का करतात, अन्नसाखळीतील पक्ष्यांचे महत्त्व, तसेच पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

blank