24.8 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home विदर्भ कवलेवाडा गावातील चार सुपुत्रांची सीमा सुरक्षा दलात निवड

कवलेवाडा गावातील चार सुपुत्रांची सीमा सुरक्षा दलात निवड

0
464

चित्रा कापसे/तिरोडा-तालुक्यातील ग्राम कवलेवाडा येथील एकाच वेळी चार युवकांची सिमा सुरक्षा दलात ( बीएसएफ) मध्ये निवड झाली असून त्या चारही युवकांचा गावात जल्लोषात सत्कार करण्यात आला. त्यामध्ये राहुल चन्दुजी पारधी,
शुभम श्रावण पारधी,कार्तीक पुरणलाल पारधी,रोहण भरतलाल ठाकरे यांचा समावेश आहे.विषेश म्हणजे तीन सुपुत्र पारधी कुटुंबांतील आहेत.या चारही कर्तबगार युवकांची BSF (सीमा सुरक्षा दल) मध्ये निवड झाल्याबद्दल संपूर्ण गावासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.देशसेवेचे व्रत स्वीकारून त्यांनी आपल्या गावाचे, तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे.

blank