उपाध्यक्ष विलास पारधी यांच्याकडे पाणी पुरवठा व जलनिस्सारण समितीचे सभापतीपद
आरमोरी : आरमोरी नगरपरिषदेच्या विविध विषय समितीच्या सभापतीपदाची निवडणूक १९ जानेवारी रोजी नगरपरीषद सभागृहात पार पडली. नगराध्यक्ष रुपेश पुणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. या निवडणुकीत सभापतींची पाचही पदे भाजपच्या वाट्याला बिनविरोध आली आहेत.
सभापतीपदांसाठी अर्ज दाखल करण्याची वेळ दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत होती. प्रत्येक पदासाठी केवळ एकच अर्ज आल्याने, पिठासीन अधिकारी प्रसन्नजीत प्रधान यांनी सर्व अर्ज स्वीकारून उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.आरमोरी नगरपरिषदेमध्ये सर्व उपस्थित सदस्यांच्या संमतीने ठरल्याप्रमाणे उपाध्यक्ष हे पाणी पुरवठा आणि जल:निस्सारण समितीचे पदसिध्द सभापती राहतील. त्यानुसार विलास पारधी यांना पदसिध्द सभापती म्हणुन घोषीत करण्यात आले.
त्यानुसार बांधकाम सभापतीपदी शुभम अशोक निंबेकार, आरोग्य व स्वच्छता सभापतीपदी राहुल मनोहर तितीरमारे, नियोजन व विकास सभापतीपदी निखील सुधाकर बोंदरे आणि महिला व बालकल्याण सभापतीपदी मिनाक्षी सिताराम गेडाम यांची निवड झाली.
सभेकरिता नगराध्यक्ष तसेच २० निर्वाचित सदस्य व ०२ नामनिर्देशित सदस्यांसह एकुण २३ सदस्य विशेष सभेला उपस्थित होते.यात न.प. चे उपाध्यक्ष विलास पारधी, भाजपचे नगरसेवक राहुल तितीरमारे, भारत बावणथडे, प्रकाश पंधरे,अक्षय हेमके, शुभम निंबेकार,निखिल बोंदरे, प्रिया साखरकर, ओमिता मडावी, मिनाक्षी देविकार, सरीता रामटेके, छाया नारनवरे, क्रुनालीनी निमगडे, मिनाक्षी गेडाम, सुनिता भोयर तर काँग्रेसचे माणिक भोयर, अक्षय बागडे, लता डोकरे, मेघा मने, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सुरज भोयर व भाजपचे स्वीकृत सदस्य पंकज खरवडे, अक्षय धकाते उपस्थित होते.या सभेला पीठासीन अधिकारी म्हणून देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी प्रसन्नजीत प्रधान तर सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून आरमोरी नगरपरीषदेचे मुख्याधिकारी प्रितीश मगरे यांनी काम पाहीले





