31.4 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते फिरते स्वच्छता व प्रचार प्रसिद्धी...

आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते फिरते स्वच्छता व प्रचार प्रसिद्धी वाहनाचे उद्घाटन

0
24

गोंदिया, दि.22 : आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके यांच्या हस्ते आज सर्व सोयी सुविधायुक्त फिरते स्वच्छता वाहनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात करण्यात आले.

         आज कचारगड आढावा बैठकीनिमित्त आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी यांच्यावतीने शासकीय आश्रम शाळा व वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आणि योजनांच्या प्रचारासाठी सर्व सोयीसुविधायुक्त फिरते स्वच्छता वाहन व प्रचार प्रसिद्धी वाहनाचे उद्घाटन श्री. उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

         यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर, आमदार संजय पुराम, जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुरुगानंथम एम., पोलीस अधीक्षक गोरख भामरे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

          शासकीय आश्रम शाळा व वस्तीगृहातील परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आधुनिक थंड पाण्याचे उच्च दाबाचे जेट क्लिनर, वॉक-बिहाइंड स्क्रबर ड्रायर मशीन, ओले व कोरडे व्हॅक्यूम क्लिनर, बॅकपॅक व्हॅक्यूम क्लिनर, सिंगल डिस्क स्क्रबर मशीन, राईड-ऑन स्वीपर मशीन, गवत कापण्याचे यंत्र (ग्रास कटर मशीन), इंडोफॉग हातात वाहून नेण्याचे फॉगिंग मशीन, रेकॉईल/रिकॉईल हाताने धरायचे ब्रश कटर मशीन, डिझेलवर चालणारी मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन, यासह आदिवासी विकास योजनांची अधिक चांगल्याप्रकारे प्रसिद्धी व्हावी अशा एलईडी वाहनाचे  लोकार्पण आज झाले