24.5 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home विदर्भ गोंदिया-भंडारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संघटकपदी जिवन लंजे

गोंदिया-भंडारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या संघटकपदी जिवन लंजे

0
35

berartimes.com
गोंदिया,दि.२८- येथील मयूर लॉन येथे पार पडलेल्या गोंदिया-भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बैठकीत सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रसर राहणारे सामाजिक कार्यकर्ते,कलावंत व शेतकरी जिवन लंजे यांची गोंदिया-भंडारा जिल्ह्याचे संघटक म्हणून निवड करण्यात आली.येत्या ८ डिसेंबरला नागपूर विधानसभा अधिवेशनादरम्यान होऊ घातलेल्या ओबीसी महामोच्र्याचा प्रसारासह संघटन बांधणीसाठी लंजे यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सयोंजक प्राचार्य बबनराव तायवाडे यांनी केली.पुर्व विदर्भातील कोहळी समाजाचे प्रतिनिधीत्व लंजे यांच्या माध्यमातून ओबीसी महासंघाला मिळाल्याने या समाजातही ओबीसीबद्दल जनजागृती करण्यात मदत होणार असल्याचे तायवाडे यांनी म्हटले आहे.लंजे यांच्या निवडीबद्दल सचिन राजुरकर,शरद वानखेडे,बबलू कटरे,खेमेंद्र कटरे,अमर वराडे,कैलास भेलावे,दुलीचंद बुध्दे,विनोद चौधरी,मनोज मेंढे,विलास चव्हाण,प्रमोद लांजेवार,रेखलाल टेंभरे आदीं ओबीसी संघर्ष समिती व महासंघाच्या सदस्यांनी अभिनंदन केले आहे.