30.9 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home राजकीय गोंदिया नपच्या सभापती पदावर भाजप राकाँचे वर्चस्व,काँग्रेसचा पराभव

गोंदिया नपच्या सभापती पदावर भाजप राकाँचे वर्चस्व,काँग्रेसचा पराभव

0
165

गोंदिया – आज ३० जानेवारी रोजी झालेल्या गोंदिया नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदाच्या निवडणुकीत भाजपचे तीन आणि राष्ट्रवादीचे दोन सभापती निवडून आले.तर काँग्रेसला पराभवाचा फटका बसला.सर्व प्रथम विषय समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये संख्याबळाच्या आधारे प्रत्येक विषय समितीमध्ये भाजपचे ६,राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचे ५ सदस्य निवडण्यात आले. सभापतीपदासाठी भाजप समर्थित अपक्ष नगरसेवक प्रदीप (पिंटू) माने बांधकाम विभाग सभापती, कैलास यादव यांनी पाणीपुरवठा विभाग , शिखा सोनपुरे महिला बालकल्याण विभागासाठी, तर राष्ट्रवादीकडून निर्मला मिश्रा नगर रचना विभाग व राष्ट्रवादीकडून पाठिंबा असलेले अपक्ष नगरसेवक अनुज जयस्वाल यांची शिक्षण समिती सभापतीपदी निवड झाली.

काँग्रेसकडून बांधकाम विभागासाठी दीपिका रुसे, पाणीपुरवठा विभागासाठी चंद्रकुमार चुटे, शिक्षण विभागासाठी क्रांती जैस्वाल, नगररचना विभागासाठी अमर रंगारी आणि महिला व बालकल्याण विभागासाठी दुर्गा तिवारी यांनी अर्ज दाखल केले होते. निवडणुकीत संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी व भाजप युतीचे पाचही सभापती निवडून आले.निवडणूक प्रक्रिया गोंदियाचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, पीठासीन अधिकारी म्हणून नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संदीप बोरकर व सहायक पीठासीन अधिकारी यांनी केले.

blank