गोरेगाव-सर्वत्र प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांच्या कल्पक विचारातुन प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत उत्कृष्ट कार्य केलेले आरोग्य कर्मचारी तसेच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेले व्यक्तिंचा सत्कार करण्यात आल्याची माहीती गोरेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
गोरेगाव तालुक्यात पाच प्राथमिक आरोग्य केंद्र असुन 25 आरोग्यवर्धिनी उपकेंद्रातील आरोग्य कर्मचारी त्यात समुदाय आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका,आरोग्य सेवक व आशा सेविका यांचे माध्यमातुन आरोग्य सेवा,उपचार व जनजागृती करण्यात येत आहे.वर्ष 2024-25 मध्ये कुटुंब कल्याण उद्दिष्टे पुर्ण केलेले 8 आरोग्य सेविका व एक आरोग्य सेवक असे एकुण 9 कर्मचारी यांचे सन्मांनचिन्ह व प्रशस्तीपत्र तसेच पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया केलेले 5 व्यक्तिंचा सत्कार करण्यात आला.सत्कार कार्यक्रम सोहळा तालुका आरोग्य कार्यालयात पंचायत समिती गोरेगावचे खंड विकास अधिकारी गौतम,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद चव्हाण तसेच तालुक्यातील सर्जन डॉ.किर्ती चुलपार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी आरोग्य सेविका ए.पी.सोनवाने,सी.बी.घासले,जे.





