24.8 C
Gondiā
Friday, July 24, 2026
Home विदर्भ आदिवासी विकास हायस्कूल गोठणगावची रमण सायन्स सेंटरला शैक्षणिक भेट !

आदिवासी विकास हायस्कूल गोठणगावची रमण सायन्स सेंटरला शैक्षणिक भेट !

0
24

एओपी गोठणगावनी केले सहलीचे यशस्वी नियोजन!

गोंदिया,दि.३१ः जिल्हा पोलीस दलातर्फे “दादालोरा पोलीस खिडकी” योजनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांचे संकल्पनेतून तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी विवेक पाटील, पोलिस स्टेशन केशोरीचे ठाणेदार मंगेश काळे यांचे मार्गदर्शनाखाली सशस्त्र दूरक्षेत्र गोठणगाव, रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट व शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विकास हायस्कूल गोठणगाव येथील 5 वी ते 10 वी च्या एकूण 54 विद्यार्थ्यांच्या 2 दिवसीय मोफत सहलीचे आयोजन करण्यात आले.
पोलिस विभागाच्या वाहनाने सर्वांना नागपूर येथे एका पोलिस कर्मचाऱ्यांसह पाठवण्यात आले, नागपूर येथे महाराजा बाग, दीक्षा भूमी, गणेश टेकडी मंदिर, स्वामी नारायण मंदिर येथे भेट देऊन देवदर्शन घेतले.अश्विन रडके ओ.एस.डी. मेघे हॉस्पिटल नागपूर यांच्या सहकाऱ्याने शालिनीताई मेघे हॉस्पिटल येथे सर्व विद्यार्थ्यांचे मोफत आरोग्य तपासणी तसेच जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली. दुसऱ्या दिवशी राजीव वरभे पास्ट प्रेसिडेंट व गिरीश मेहता प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ नागपूर साऊथ ईस्ट यांच्या पुढाकाराने मेट्रो सफर करण्यात आली. गोठणगाव सारख्या आदिवासी व दुर्गम नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी कधी न पाहिलेली मेट्रो रेल्वे मोठ्या उत्साहाने पाहिली. पुढे रमण सायन्स सेंटर येथे भेट देऊन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने विविध प्रदर्शने दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांना तारामंडळ मधील विविध ग्रहांची रचना, कार्य 3D प्रोजेक्टर द्वारे दाखवण्यात आले.
सर्व विद्यार्थ्यांना रोटरी क्लब तर्फे पाणी बॉटल गिफ्ट देण्यात आले. तसेच जेवणाची व नाश्ता ची उत्तम व्यवस्था करण्यात आली.सदर सहलीचे यशस्वी नियोजन हे एओपी गोठणगाव चे प्रभारी अधिकारी निळकंठ गित्ते यांच्या पुढाकाराने तसेच प्रपोगंडा सेल गोंदियाचे भास्कर हरिणखेडे व जिल्हा पोलिस चे हवालदार भावते, थेर, मिसार यांच्या मदतीने करण्यात आले.

blank