25.1 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home विदर्भ सडक अर्जुनी येथे कुणबी समाज भवनाचे लोकार्पण

सडक अर्जुनी येथे कुणबी समाज भवनाचे लोकार्पण

0
66

सडक अर्जुनी,दि.०२- -जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती सोहळा व महिला हळदीकुंकू कार्यक्रमानिमित्त समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या कुणबी समाज भवनाचे लोकार्पण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर व शुभांगी सुनील मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. ३० लक्ष रुपयाचे बांधकाम माजी खासदार मा. सुनीलजी मेंढे यांच्या विकास निधीतून पूर्ण करण्यात आले..

कुणबी समाजासाठी स्वतंत्र व सुसज्ज समाज भवन उपलब्ध होणे ही समाजाच्या एकोपा, सांस्कृतिक जतन आणि भावी पिढ्यांच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी असल्याचे मत यावेळी सौ. मेंढे यांनी व्यक्त केले. या समाज भवनामुळे विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांना चालना मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

संत तुकाराम महाराजांचे विचार, सामाजिक समतेचा संदेश आणि महिलांच्या सन्मानाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. अशा उपक्रमांमुळे समाज अधिक संघटित व सक्षम होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास जि.प. अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, सौ. शारदा राजकुमार बडोले, देवचंद तरोने,  न.प. उपाध्यक्ष वंदना डोंगरवार,अंकित भांडारकर,राजभाऊ हेडाऊ, सायमा शेख,कमला अग्रवाल,राजेश कटाने,मधुसूदन दोनोडे,शीलाताई भंडारकर, सभापती मुक्ताबाई हत्तीमारे, सभापती रजनीताई परिहार,शशिकला टेंभुर्णी,रामभाऊ गायधने,महिंद्र वंजारी, श्री. नारायण भंडारकर,माधवराव तरोने,पुष्पा खोटेल,विनोद बारसागडे ,दिनेश हुकरे,ललित डोंगरवार, यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल संत गाडगे कुणबी समाज संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व आयोजकांचे मान्यवरांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.

blank