26.2 C
Gondiā
Sunday, July 26, 2026
Home राजकीय ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

0
76

गोंदिया, दि.3 : राज्य निवडणूक आयोगाचे 29 जानेवारी 2026 चे पत्रान्वये जिल्ह्यातील दिनांक 31 जानेवारी 2026 पर्यंत निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य/थेट सरपंचाच्या रिक्त झालेल्या जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यानुसार मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 1 जुलै 2025 आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक सोमवार 16 फेब्रुवारी 2026, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी सोमवार 16 फेब्रुवारी ते शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक मंगळवार 24 फेब्रुवारी 2026. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील यांनी कळविले आहे.

blank