32.8 C
Gondiā
Wednesday, June 17, 2026
Home गुन्हेवार्ता विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार; प्राध्यापकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!

विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार; प्राध्यापकावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल!

0
60

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्राध्यापका विरोधात शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, दिलिप ज्ञानेश्वर जाधव (वय ४५, मुळ रा. सावर्डे, चिपळूण सध्या रा. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित प्राध्यापकाचे नाव आहे. या प्राध्यापक पिडीता इयत्ता १० वीत असल्यापासून तिच्या ओळखीचा होता. पिडीता अकरावीसाठी या महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यापासून संशयित प्राध्यापकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. ही घटना सन २०२१ ते २०२६ या कालावधीत घडली आहे.

याबाबत पिडीतेने आपल्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. तक्रारीवरुन शहर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास शहर पोलीस करत आहेत.