अर्जुनी-मोर.-युगपुरुष युवा मंच पिंपळगाव/खांबी यांच्या वतीने परिवर्तनशील साहित्य संमेलनाचे आयोजन ८ फेब्रुवारी ला करण्यात आले होते. या संमेलनाचा मुख्य उद्देश समाजात वैचारिक जागृती निर्माण करणे, परिवर्तनशील विचारांचा प्रसार करणे तसेच साहित्याच्या माध्यमातून सामाजिक भान वाढवणे हा होता. या संमेलनामध्ये प्रसिद्ध प्रबोधनकार भाग्यश्री इंगळे यांच्या संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या साहित्य संमेलनाचे औचित्य साधुन अर्जुनी-मोर. तालुक्यात उत्कृष्ट सामाजीक सेवा करणारे येरंडी /देव.येथील युवा सामाजीक कार्यकर्ते तथा कृ.उ.बा.स अर्जुनी-मोर. चे संचालक तथा आदिवासी सेवा सह.संस्था बाराभाटीचे उपाध्यक्ष व्यंकट खोब्रागडे यांचा आमदार ईंजी.राजकुमार बडोले,जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांचे हस्ते शाल व स्मृतीचिन्ह देवुन जाहीर सत्कार करण्यात आला.तसेच अर्जुनी-मोर. नगरपंचायत चे नगरसेवक तथा बांधकाम सभापती व युवा सामाजीक कार्यकर्ते दानेश साखरे व निसर्ग वन्यजीव अभ्यासक प्रभाकर दहिकर यांचाही मान्यवरांचे हस्ते शाल व स्मृतीचिन्ह देवुन गौरव करण्यात आला.
यावेळी या कार्यक्रमाला राजकुमार बडोले आमदार तथा माजी मंत्री,जि.प.अध्यक्ष लायकराम भेंडारकर, नितेष बोरकर सामाजिक कार्यकर्ता, दिलवर रामटेके, लैलेश्वर शिवणकर संचालक ख.वि., सदिप कापगते उपसभापती पं.स., दानेश साखरे नगरसेवक, रत्नदिप दहिवले माजी जि.प. सदस्य, व्यंकर खोब्रागडे संचालक कृ.उ.बा.स., प्रभाकर दहिकर वन्यजिक मार्गदर्शक, प्रमोद डोंगरे, सचिन डोंगरे सरपंच चान्ना, विलास पुंडे सरपंच पिंपळगांव, विश्वनाथ खोब्रागडे, प्रदिप कांबळे सरपंच अरततोंडी, दौलत डोंगरे भंडारा, सरीता रामरेके सरपंच चापटी, चंद्रशेखर बोरकर, किशोर बेलखोडे उपसरपंच बाराभाटी, धम्मदिप मेश्राम, बुध्दरत्न रामटेके, मंदिप रामटेके, संघर्ष नंदागवळी, अश्विन डोंगरे, ईश्वर खोब्रागडे, सुरेंद्रकुमार ठवरे पत्रकार, राकेष भास्कर, निरुता मेश्राम उपसरपंच, सकुन मेश्राम, विलास लंजे, विवेकानंद मेश्राम, नितिन कांबळे, हेमराज बडोले, खुशाल तवाडे, उमेष प्रधान, अरविंद खोब्रागडे, नानाजी रामटेके, नागेष कांबळे, नानेश्वर खोब्रागडे, संजय बन्सोड, आदित्य बोरकर, दिक्षीत रंगारी, साखरेजी, तुषार सांगोडे व इतर मान्यवर आणि खुप मोठ्या संख्येने महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते.





