भंडारा दि.११ जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण भंडारा व जिल्हा उद्योग सुरक्षा व आरोग्य विभाग यांचे संयुक्त विद्यमाने काल दि.१० फेब्रुवारी रोजी वरठी येथील सनफ्लॅग आयर्न स्टिल कंपनी येथे रंगीत तालिम (Mock Drill) चे आयोजन करण्यात आले. सदर दरम्यान राष्ट्रिय आपदा मोचक दल (NDRF), जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा उद्योग सुरक्षा व आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, पोलिस विभाग व सनफ्लॅग कंपनी सुरक्षा विभाग यांनी या रंगीत तालिम मध्ये सहभाग नोंदविला.
एखादी आकस्मिक घटना झाल्यानंतर सर्व संबंधित विभाग कशाप्रकारे,किती कालावधीत प्रतिसाद देतात, तसेच सदर दरम्यान आदर्श कृतिपध्दतीचा योग्य अवलंब करतात किंवा कसे? याबाबतची पडताळणी या रंगीत तालिम दरम्यान करण्यात आली. सदर तलिम मध्ये सनफ्लॅग येथे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झालेली असुन 05 व्यक्ती त्यामुळे बाधित झालेले असल्याचे नाटकिय प्रसंग तयार करण्यात आला असुन सदर बाबत सर्व विभागांना दुरध्वनी वर कळविण्यात येवून त्यांचे प्रतिसाद नोंदविण्यात आला. सदर दरम्यान रंगीत तालिमचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या रंगीत तालिम करीता श्री मनोहर चव्हाण-निवासी उपजिल्हाधिकारी, श्रीमती पल्लवी गंपावार-उपसंचालक उद्योग सुरक्षा, श्री अभिषेक नामदास-जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, श्री सतिश श्रीवास्तव-व्यवस्थापक सनफ्लॅग कंपनी, श्री संतोष चौहान- डिप्टी कमांडंट NDRF, श्री चंद्रकेतू शर्मा-सहायक कमांडेंट NDRF, श्री ब्रीजेश यादव- इंस्पेक्ट NDRF, श्री समीर गणविर- अग्नीसुरक्षा अधिकारी, डॉ. श्रीकांत आंबेकर, श्रीमती शुभांगी लांबकाने-सहा.महसुल अधिकारी, प्रियांका टी-DDMS उपस्थित होते.





