35.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ विद्यार्थ्यांनी जाणून घेतली त्यांच्यासाठीच्या योजनांची माहिती

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली त्यांच्यासाठीच्या योजनांची माहिती

0
29

blank

जिल्हा माहिती कार्यालयाच्या छायाचित्र प्रदर्शनीस विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद

 गोंदिया, 14 : अनुसूचित जातीतील घटकांसाठी जिल्हा माहिती कार्यालय आणि सामाजिक न्याय विभाग यांच्यावतीने आयोजित छायाचित्र प्रदर्शनीच्या तिसऱ्या आणि अंतिम दिवशी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी असणारा योजनांचा लाभ जाणून घेतल्या.

नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची तीन दिवसीय छायाचित्र प्रदर्शनी आयोजित करण्यात आले होते.  आज या प्रदर्शनीचा तिसरा दिवस होता.

गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचालित एस. एस. गर्ल्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आज या प्रदर्शनास भेट दिली. प्राचार्य डॉक्टर शारदा महाजन यांनी त्यांच्या महाविद्यालयातील बी. ए. तृतीय वर्ष, बी. ए. प्रथम वर्ष, बी. एस. सी. द्वितीय वर्ष आणि अकरावी आर्ट्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांना आज प्रदर्शन पाहण्यास  पाठविले. या विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाचे प्राध्यापक ही उपस्थित होते. हे प्रदर्शन खूप माहिती पूर्ण असल्याच्या प्रतिक्रिया महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांनी व्यक्त केल्या.

तीन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांच्या हस्ते झाले. या प्रदर्शनात अनुसूचित घटकातील 0 ते व्यक्ती असेपर्यंतच्या एकूण 46 योजनांचे प्रदर्शन लावण्यात आलेले होते. तसेच अनुसूचित जातीच्या योजनांचे जिंगल ऑडिओ, व्हिडिओ ही येथे एलईडीवर प्रदर्शित करण्यात आलेले होते.   प्रशासकीय इमारतीत शासकीय काम निमित्त येणाऱ्या नागरिकांनीही या प्रदर्शनीचा लाभ उचलला तसेच. या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे विद्यार्थिनी ही भेट दिली होती. यासह अधिकारी कर्मचारी यांनीही भेटी देऊन प्रदर्शनात प्रदर्शित योजनेची माहिती मिळविली.

blank