
गोंदिया,दि.१४-विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूकीत अवांडःमयीन लोकांचा शिरकाव हाणून पाडण्याकरीता वयाच्या ७६ व्या वर्षी पुन्हा आपणास पॅनलसह रिंगणात उतरण्याची वेळ आली आहे.गेल्या १०-१५ वर्षात विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकार्यांनी व्यवसायिक दृष्टिकोन समोर ठेऊन काम केल्याने विदर्भातील साहित्य संघाच्या शाखांशी संपर्क तुटला गेला.विदर्भ साहित्य संघ हे मराठी अमराठी भेदभाव बाजूला सारत बहुभाषिकांच्या संस्कृतीसह साँस्कृतिक व भाषा जपण्याकरीता आहे.हे गेल्या काही वर्षात विसरले गेल्याने आणि ज्यांना लेखन साहित्य कथा नाटक काहीही लिहिण्याचा अनुभव नाही अशा लोकांनी आता यात शिरण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्याकरीता होऊ घातलेल्या विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक रिंगणात आपण पॅनल घेऊन रिंगणात असल्याची माहिती डाॅ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली.ते गोंदिया येथील भवभूती रंगमंदिरात निवडणूक प्रचाराकरीता आले असता पत्रकारपरिषदेत आज(दि.१४)बोलत होते.डाॅ.जोशी म्हणाले की,आमचा उद्देश साहित्य संस्था वाचविण्याचा आहे.केवळ विदर्भ साहित्य संघच नव्हे तर साहित्याशी संबधित सर्व संस्था ज्यामध्ये व्यवसायिक व राजकारणाने प्रेरीत असलेल्या लोकांचा शिरकाव झालेला आहे,त्या सर्व संस्थांना वाचविण्याकरीता रिंगणात आहे.या साहित्य संस्थेच्या माध्यमातून विदर्भातील सर्वभाषिक लोकांच्या साहित्याचे जतन करुन त्यांची संस्कृती टिकवण्याकरीता अवाडःमयीन लोकांच्या हाती सत्ता व नेतृत्व लादू पाहणार्यांना आमची पॅनल काम करणार आहे.या निवडणूकीत गोंदिया जिल्ह्यात १७५ मतदार आहेत,त्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावतांना साहित्य,नाट्य,कला आदि क्षेत्राचा अनुभव लेखन करणारे कोण याचा विचार करुन आपले मतदान १४ मार्चपर्यंत पोचवावे असे आवाहन केले.विद्यमान अध्यक्ष प्रदिप दाते यांच्या नेतृत्वात संस्था डबघाईस आली असून संस्थेचा वापर जमीन ताब्यात घेऊन व्यवसायिकीकरण व राजकारणाकरीता करण्यात आल्याची टिका केली.तर संस्थेचा अध्यक्ष हा इमारतीचा प्रमुख नको तर वांडःमयीन अभ्यासाची जाणीव असलेला असावा याकरीता असाहित्यीक लोकांची घुसखोरी थांबविण्याचा प्रयत्न असल्याचे डाॅ.जोशी म्हणाले.या पत्रपरिषदेला डाॅ.जोशी यांच्यासोबत दिपक गिरधर,प्रमोद भुसारी,विलास देशपांडे,गोंदिया शाखा अध्यक्ष मोहन देशपांडे,उपाध्यक्ष माणिक गेडाम उपस्थित होते.





