34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव हलबी येथे रानटी हत्तींचा धुमाकूळ

देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव हलबी येथे रानटी हत्तींचा धुमाकूळ

0
60

blank

; पिकांचे मोठे नुकसान, आमदार रामदास मसराम यांची पाहणी

देसाईगंज : तालुक्यातील पिंपळगाव हलबी गावांमध्ये रानटी हत्तींनी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याची घटना समोर आली आहे. रात्रीच्या सुमारास शेतात शिरलेल्या हत्तींनी धान, मका व इतर पिकांची नासधूस केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्वरित पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. “शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. प्रशासनाने विलंब न करता कार्यवाही करावी,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवून हत्तींचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच ACF, RFO व वनरक्षकही यावेळी उपस्थित होते. गावकऱ्यांनी मात्र रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

यावेळी माजी सभापती परसराम टिकले, तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, परशुराम ठाकरे, भुमेश्वर शिंगाडे, सदानंद दोनाडकर, संदीप धोटे, रोशन मेश्राम, गजेंद्र नाईक, बंडू घरत, देवानंद भोयर, जितेंद्र भोयर, उद्धव घरत, लीलाधर दोनाडकर, रमेश भोयर, हिराजी बालापुरे, हेमराज नाकतोडे, सुरेश बुल्ले, श्रावण पत्रे, कुसन बालापुरे, तिमा बालापुरे, प्रफुल धोटे, नीलकंठ राऊत, सुरज पारधी, रितेश गाडगे, मनोहर बुल्ले, टिकाराम धोटे, काशिनाथ धोटे, नीलकंठ भोयर, नेताजी मिसार, प्रभुनाथ कवासे, आनंदराव नाईक, नामदेव नाईक, कुशाल नाईक, आसाराम प्रधान, राजेंद्र राऊत, लिलाबाई प्रधान, हिराजी बुल्ले, प्रेमचंद बुल्ले, सुरज बुल्ले, यादव मेश्राम, केशव मेश्राम, रत्नाकर राऊत, गिरीधर चूलपार, शिशुपाल कमल, महेश राऊत, मुखर्जी राऊत, हिरालाल प्रधान आदी उपस्थित होते.

blank