29.4 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home महाराष्ट्र श्रीरामपूर पालिकेच्या ०४ कर्मचाऱ्यांना ICU मध्ये हलवले…

श्रीरामपूर पालिकेच्या ०४ कर्मचाऱ्यांना ICU मध्ये हलवले…

0
28

श्रीरामपूर – श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छतेचे काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना आज मंगळवारी सकाळी मळमळ व चक्कर येऊ लागल्याने अचानकपणे त्यांना तातडीने श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेच संपूर्ण शहरात उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 मधील बेलापूररोड परिसरातील बजरंगनगर जवळील मसाले गल्ली भागात हे स्वच्छता कर्मचारी हातानेच विषारी पावडर जंतू मारण्यासाठी मारत होते. त्यावेळेला त्यांच्या हातात ग्लोज किंवा तोंडाला मास्क नव्हते असे तेथील लोकांनी सांगितले.पावडर मारतेवेळी वासाने चक्कर येऊ लागल्याने व मळमळ होऊ लागल्याने तातडीने मुकादम व नागरिकांनी त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.ज्या ठेकेदाराकडे हे कर्मचारी आहेत ते अधिकृत पालिकेचे कर्मचारी आहे की कंत्राटी हे मात्र समजू शकले नाही.
दरम्यान यासंबंधी साखर कामगार रुग्णालयाशी संपर्क साधला असता पालिकेच्या स्वच्छ विभागात काम करणारे 4 कर्मचारी मळमळ होऊ लागल्याने व चक्कर येऊ लागल्याने तसेच त्यांना त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ठेकेदाराचा हलगर्जीपणा का पालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा ? नेमके कोणाच्या हलगर्जीपणामुळे या कर्मचाऱ्यांना हा त्रास झाला याची चर्चा सुरू होत असून आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचारी जागेवर नव्हते.साखर कामगार रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्मचाऱ्यांची नावे सुनील बागडे वय 50,चंद्रकांत दळवी,वय 56,गोकुळ मारसाळे,वय 34 ,अरुण अस्वले,वय 35 असे असल्याचे समजते आहे.

blank