अर्जुनी मोरगाव,दि. 24 –- अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कऱ्हांडली गावात राहणार्या बसूराज शहारे या शेतकऱ्याच्या अडीच एकर शेता मधील धनाचे पुंजने ( गंजी ) अज्ञात इसमाने जाळून टाकल्यामुळे शहारे यांचे जवळपास ८० हजराचे नुकशान झाले आहे . बासुराज हे रोजच्या प्रमाणे आज सकाळी शेताकडे फिरण्या करीत गेले असताना हि घटना उघडकीस आली .दिवाळी तोंडावर असल्याने शहारे यांना सावकाराचा आणि खाजगी लोकनचा कर्ज फेडायचा असल्याने त्यांनी आपल्या अडीच एकर शेतीतील एक हजार दहा या हलक्या वाणाची लागवळ केली होती .आणि धान कंपन्या सारखे झाल्याने दोन दिवसा आधीच त्यांनी मजुरांच्या साह्याने धनाची कापणी करून एकत्र गोडा करत धानाचा पूजना तयार करून शेतात ठेवला होता मात्र काल रात्री एका अज्ञात इसमाने बसुराज शहरे यांच्या शेतातील धानाच्या पुजण्याला आग लावल्याने शेतीत जमा केलेला पीक पूर्ण ताह जळून खाक झाल आहे त्यामुळे त्यांनी किशोरी पोलिसात अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल केला असून शासनाने तवरीत जळलेल्या धान पिकाची पाहणी करून मोबदला देण्याची मागणी शहारे यांनी केली आहे





