26.1 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home विदर्भ गोंदिया जिल्हा शिक्षणाधिकारी योजना कार्यालय वार्यावर,अधिकारी कर्मचारी बेपत्ता

गोंदिया जिल्हा शिक्षणाधिकारी योजना कार्यालय वार्यावर,अधिकारी कर्मचारी बेपत्ता

0
148
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (0.97526044, 0.69579923);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 34;

गोंदिया,दि.२० ःशिष्यवृत्ती योजना (५वी, ८वी), गणवेश पुरवठा, फुलोरा उपक्रम, मुख्यमंत्री बालिका संरक्षण योजना, पीएम श्री शाळा आणि नवीन साक्षरता कार्यक्रम यांसारख्या योजनांचा लाभ योग्य रितीने उपलब्ध व्हावा याकरीता शिक्षणाधिकारी योजना कार्यालय सुरु करण्यात आले.मात्र गोंदिया जिल्ह्यातील हे कार्यालय आज(दि.२० मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंतच्या घडीला ओसाड कार्यालय ठरले असून येथील अधिकारी व कर्मचारी हे आपल्या मुळ आस्थापना असलेल्या कार्यालयात न बसता बेपत्ता आढळून आले.विशेष म्हणजे येथील कर्मचारी हे नेहमीच गायब राहत असूनही पारदर्शक आणि इमानदार अधिकारी म्हणून स्वतःला समजणारे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कधीच या विभागातील गोंधळावर निर्णय घेतला नाही.या कार्यालयात नियुक्त असलेले कर्मचारी व अधिकारी हे कधीच आपल्या कार्यालयात बसताना आजपर्यंत दिसून आलेले नाहीत,यावरुन यांच्यावर सीईओचा धाकच नाही हे सुध्दा स्पष्ट झाले आहे.

विशेष म्हणजे या कार्यालयात ज्या भगत नामक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.त्यांच्यावर गंगाझऱी पोलीस स्टेशन येते नियमबाह्य शिक्षक नोकरभरती प्रकरणात गुन्हा दाखल असताना पुन्हा शिक्षण उपसंचालकाने त्यांना गोंदियातच नियुक्ती देणे यावर शंका व्यक्त करण्यात येत असून या नियमबाह्य नियुक्तीमध्ये सुध्दा आर्थिक गैरव्यवहाराची शंका व्यक्त केली जात आहे.जिल्हा शिक्षण नियोजन विभागातील काम न करता पैशाच्यामोहापायी मलाई मिळत असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात आपली प्रतिनियुक्ती करुन बसल्याचे दिसून येत आहेत.शिक्षणाधिकारी योजना कार्यालयातील मुळ आस्थापना असलेले वरिष्ठ लिपिक भगत यांनी नागपूर येथील उपसंचालक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरुन माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद गोंदिया येथे प्रतिनियुक्ती करुन घेतल्याचे वृत्त आहे.गेल्या अनेक वर्षापासून भगत माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसले असून बोगस नोकर भरती व इतर अनेक प्रकारची कामे यांच्याच कार्यकाळात घडलेली आहेत,असे असतानाही वरिष्ठ अधिकार्यांच्या डोळ्यात धुळ फेकत शिक्षणाधिकारी योजना कार्यालय वार्यावर सोडून माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात बसून आपला आर्थिक लाभाची कामे करण्याकरीता फाईल थांबवणे,चुका काढणे,त्रास देण्यासारखी कामे करीत असल्याची ओरड सुरु झाली आहे.