24.7 C
Gondiā
Tuesday, August 18, 2026
Home विदर्भ गोंदिया-ब्रह्मपुरी ‘हॉल्टिंग’ बसची प्रतीक्षा कायम

गोंदिया-ब्रह्मपुरी ‘हॉल्टिंग’ बसची प्रतीक्षा कायम

0
43

कोरची-कोरोना काळात बंद पडलेली कोरची-नागपूर एसटी बससेवा अखेर पुन्हा सुरू झाल्याने तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, अनेक वर्षांपासून धावणारी गोंदिया-ब्रह्मपुरी हॉल्टिंग बससेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नसल्याने कोरची परिसरातील व्यापारी व ग्रामीण नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोना काळानंतर अनेक एसटी बससेवा बंद झाल्या होत्या. त्यामध्ये कोरची-नागपूर बससेवेचाही समावेश होता. आता ही बससेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, कर्मचारी तसेच वैद्यकीय उपचारासाठी नागपूरला जाणाऱ्या रुग्णांची मोठी सोय झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मात्र, पूर्वीपासून नियमित धावणारी गोंदिया-ब्रह्मपुरी हॉल्टिंग बससेवा अजूनही सुरू करण्यात आलेली नाही. ही बस कोरची परिसरातील व्यापारी, शेतकरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात होती. या बसमुळे गोंदिया व ब्रह्मपुरीकडे जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होती. मात्र, ही बस बंद केल्याने या भागातील व्यापारी व नागरिकांना अडचणी येत आहेत.