गोंदिया : जिल्ह्यातील शासकीय महाविद्यालय, जिल्हा वैद्यकीय रुग्णालय, बाई गंगाबाई स्त्री रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रात मुलींसाठी मोफत लसीकरण सत्रे आयोजित करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने प्राथ. आरोग्य केंद्र मोरवाहीयेथे जि. प. सदस्य पूजा सेठ, लक्ष्मी तरोणे यांच्या हस्ते एचपीव्ही लसीकरणाचा शभारंभ करण्यात आला.
यावेळी पोलीस पाटील ठाकरे, सरपंच बिरजूला भेलावे, डॉ. स्नेहल खोब्रागडे व डॉ. सुशांत ठाकरे यांचे सह प्रा. आ. केंद्र
मोरवाही येथील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहायिका, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा सेविका गट प्रवर्तक व परिचर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या उपस्थीतीत पाच मुलींना एचपीव्ही लसीकरणाचा डोज लावण्यात आला. यावेळी आरोग्य सेविका लक्ष्मी कटरे यांनी लस टोचक, व्हेरीफायर मनिषा बिदेन तर पर्यवेक्षण आरोग्य सहाय्यक संदीप पारधी व बी. जे. नागपुरे, समुपदेशक एस. वाय. चंदेल यांनी कामकाज पाहीले. लसीकरणाबाबत भीती व अफवा न बाळगता पालकांनी पुढाकार घ्यावा. यामुळे मुलींचे आरोग्यविषयक भविष्य सुरक्षित होवु शकत असल्याची माहीती जिल्हा परिषद सदस्य पूजा सेठ यांनी यावेळी केले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. रोशन राऊत यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रत्यक्ष कार्यवाहीत गावपातळीवरील शासकीय आरोग्य संस्थेत लसीकरण केले जात आहे. आरोग्य संस्थेतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी यांचेमार्फत लोकांमधील गैरसमजुती, अफवांचे निराकरण समुपदेशाने करण्यात येत आहे.





