24 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home मराठवाडा/खान्देश अत्याचारग्रस्तांच्या 14 वारसांना परभणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नोकरी आदेशाचे वितरण

अत्याचारग्रस्तांच्या 14 वारसांना परभणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नोकरी आदेशाचे वितरण

0
35
परभणी, दि. 24  : जिल्ह्यातील 14 अत्याचार पिडीत व्यक्तींच्या वारसदारांना सामाजिक न्याय विभागात मुला/मुलींची शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतिगृह व सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, बुलढाणा, अकोला, बीड, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शिपाई व सफाईगार या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते आज नियुक्तीचे आदेश संबंधितांना वितरीत करण्यात आले.
अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (सुधारित अधिनियम, २०१५) व सुधारीत नियम, २०१६ अंतर्गत अनुसूचित जाती व जमातीच्या ज्या व्यक्तीचा खून किंवा मृत्यु झाला असेल अशा दिवंगत व्यक्तीच्या एका पात्र वारसास शासकिय / निमशासकीय नोकरी देण्याची तरतूद आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या नियुक्ती आदेश वितरणप्रसंगी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजु एडके, सहाय्यक लेखाधिकारी संजय पाटसकर, समाजकल्याण निरीक्षक तुषार दवणे, प्रकाश कांबळे आदींसह पीडितांचे नातेवाईक उपस्थित होते.