23.5 C
Gondiā
Sunday, August 23, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात इंधन तुटवडा नाही : जिल्हाधिकारी प्रजित नायर

जिल्ह्यात इंधन तुटवडा नाही : जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
448
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;

गोंदिया, 24,: भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी समन्वयाने काम करीत आहे. त्यामुळे इंधनाचा तुटवडा होणार असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कोणतीही कमतरता नाही. पूर्वी जे दर होते तेच सध्या लागू आहेत. सरकारकडूनही सध्या इंधनाच्या दरात वाढ झालेली नाही, जसे निर्देश येतील तशा सूचना नागरिकांना पर्यंत पोहोचविण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेले आहेत.
00000