23.9 C
Gondiā
Monday, August 24, 2026
Home विदर्भ 28व 29 मार्च रोजी आंबेडकरी विचार संगीतीचे आयोजन,ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर अध्यक्षपदी

28व 29 मार्च रोजी आंबेडकरी विचार संगीतीचे आयोजन,ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर अध्यक्षपदी

0
41

अमरावती-आंबेडकरवादी ज्ञानव्यवहारात मौलिक योगदान देऊन साहित्य, तत्वचिंतन आणि चळवळीला सम्यक दिशादर्शन करणारे  ताराचंद्र खांडेकर यांनी समतानिष्ठ परिवर्तनवादी चळवळीत महत्त्वाचे कार्य केले आहे. त्यांच्या सर्जनक्षमव रक्तातील जीवनकार्याचा गौरव करण्याच्या निमित्ताने आंबेडकरी ज्ञानप्रणाली व समकालीन तत्वसंघर्षाच्या संदर्भात चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे. या भूमिकेतून संबोधिचे वतीने 28 व 29 मार्च डॉ .बाबासाहेब आंबेडकर संस्कार भवन ,भीम टेकळी अमरावती या दोन दिवसीय विचार संगीतीच्या पहिल्या सत्राच्याअध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत ताराचंद्र खांडेकर राहणार असून सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. महेंद्र भवरे यांचे हस्ते विचार संगीताचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून इ.मो. नारनवरे नागपूर, का. रा. वालदेकर, नरेन्द्र शेलार, बबन चहांदे, डॉ. मा. प. थोरात हे उपस्थित राहणार आहे.
दुसर्‍या सत्रात सायं 8.00वा.सुप्रसिध्द कवी, गझलकार इ. मो. नारनवरे यांचे अध्यक्षतेखाली ‘ आंबेडकरी गझल जागर’ हा गझलांचा मुशायरा होणार आहे. यामधे विदर्भातील आंबेडकरी गझलकार रमेश बुरबुरे, नंदकुमार दामोदरे, सुदाम सोनुले, संजय घरे, देविलाल रौराळे,रविंद्र शिरसाट, स्नेहल सोनटक्के, रोशन गजभिये, अतुलकुमार ढोके, विनोद बागडे, गुलाबराव मेश्राम, गिरीश खोब्रागडे, हे मान्यवर गझलकार सहभागी होणार आहे.
रविवार 29 मार्च 26 रोजी सकाळी 10.00वा.सुप्रसिध्द कवी गोविंद वाघमारे, नागपूर यांचे अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार असून त्यामधे मान. बबन चहांदे, दिलीप सुर्यवंशी, मोरेश्वर सहारे, प्रभाकर गंभीर, गणेश थोरात, नारायण थोरात, सुरेखा भगत, बबन इंगोले, मायावती वासनिक, गणेश लांडगे, गौतम ढोके, संजय मोखडे, विलास थोरात हे कवी आपल्या रचना सादर करणार आहेत.
चवथ्या सरकारमधून प्रसिद्ध विचारवंत मान. का. रा. वालदेकर यांचे अध्यक्षतेखाली “आंबेडकरवादी तत्वचिंतनात ताराचंद्र खांडेकर यांचे योगदान ” या विषयावर परिसंवाद आयोजित आहे. या परिसंवादात ‘खांडेकरांचे साहित्य, संस्कृती चिंतन’ यावर डॉ. सुखदेव ढाणके, ‘खांडेकरांचे आर्थिक चिंतन’ या विषयावर नरेन्द्र शेलार, ‘खांडेकरांचे राजकीय चिंतन’ या विषयावर इ.मो.नारनवरे तर ‘खांडेकरांचे सामाजिक चिंतन’ या विषयावर का. रा. वारंवार हे आपले चिंतन मांडणार आहेत.
पाचव्या सत्रात मान. बबन चहांदे,नागपूर यांचे अध्यक्षतेखाली “इ. स. 2000नंतरचे आंबेडकरी साहित्य ” या विषयावर परिसंवाद आयोजित आहे यामधे ‘आंबेडकरी साहित्यातील समीक्षा व सौंदर्य शास्त्रीय लेखन’ प्रा. डॉ. अशोक इंगळे, अकोला/ ‘आंबेडकरी साहित्यातील वैचारिक लेखन’प्रा. डॉ. भास्कर पाटील, अकोला / ‘आंबेडकरी साहित्यातील नाट्य लेखन’ प्रा. डॉ. शांतरक्षित गावंडे हे आपले विचार मांडणार आहेत.
सहावे सत्र मान. ताराचंद्र खांडेकर यांचे अध्यक्षतेखाली विचार संगीताचा समारोप होईल या प्रसंगी प्रा. डॉ. आशाताई थोरात ,डॉ. भिमरावजी वाघमारे, यांची उपस्थिती राहणार आहे.या दोन दिवसीय विचार संगीतीमधील वैचारिक प्रबोधनाचे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी साहित्यिक, कवी, सामाजिक कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संबोधी:डाॅआंबेडकर स्टडी सर्कल, द्वारा करण्यात आले आहे .