गोंदिया,दि.२६ केटीएस जिल्हा रुग्णालयाअंतर्गत असलेल्या बाई गंगाबाई रुग्णालयाजवळील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या पंचेचाळीस विद्यार्थिनींना आज, गुरुवार, २६ मार्च रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास अन्नातून विषबाधा झाली. सध्या, सर्व विद्यार्थिनींना उपचारासाठी स्थानिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून, त्या धोक्याबाहेर आहे.घटनेची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ.अभिजित गोल्हर यांनी रुग्णालयात जाऊन बाधित विद्यार्थीनींची भेट घेत विचारपूस केली. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या परिसरात शासकीय नर्सिंग महाविद्यालय असून तिथे १८५ प्रशिक्षणार्थी नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅन्टीनमधून जेवण आणि नाश्ता दिला जातो.
बुधवार, २५ मार्च रोजी रात्री विद्यार्थ्यांनी जेवण करून ते झोपायला गेले. नंतर त्या रात्री दोन-तीन विद्यार्थ्यांनीना पोटात दुखू लागले आणि उलट्या होऊ लागल्या.त्यामुळे त्यांना उपचारासाठी तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता, नर्सिंग कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांनींनाही तसाच त्रास जाणवू लागला.त्यामुळे, या सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, नर्सिंग कॉलेजमधील सर्व १८५ विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधून जेवण केले होते. यापैकी ४५ जणांना संसर्ग झाला. दरम्यान, हे सर्व ४५ विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असून, तेथील डॉक्टरांनी त्यांच्या लक्षणांची पुष्टी केली आहे.त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे. विषबाधेचे कारण निश्चित करण्यासाठी अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.




