भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे आज सकाळी भंडाऱ्यावरून नागपूरकडे प्रवास करत असताना अपघातातून थोडक्यात बचावले. नागपूरजवळ वडोदा परिसरात, हल्दीराम कंपनीसमोर त्यांच्या वाहनाला एका ट्रकने आज सकाळी धडक दिल्याची घटना घडली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि खासदार पडोळे सुरक्षित आहेत. ते दिल्ली येथे अधिवेशनासाठी रवाना होत असताना हा अपघात घडला.
विशेष म्हणजे, याच मार्गावर त्यांच्या वाहनाचा हा तिसरा अपघात असल्याने या रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन तात्काळ उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.
या घटनेनंतर कार्यकर्ते व नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून, खासदारांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.





