29.4 C
Gondiā
Tuesday, July 28, 2026
Home विदर्भ बोदलकसा येथे उजव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी ३१ कोटीच्या कामांचे आमदार रहांगडालेंच्या हस्ते भूमिपूजन

बोदलकसा येथे उजव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी ३१ कोटीच्या कामांचे आमदार रहांगडालेंच्या हस्ते भूमिपूजन

0
68

गोंदिया,दि.१६ः तिरोडा तालुक्यातील बोदलकसा उजव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी तब्बल ३१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, या कामाचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.या कालव्याच्या नुतनीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सिंचन सुविधेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. यामुळे शेती उत्पादन वाढीस लागून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी आमदार रहांगडाले यांनी व्यक्त केला.तसेच “शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सिंचन सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.कार्यक्रमाला प्रामुख्याने जि.प.सभापती रजनी कुंभरे, पंचायत समिती सभापती तेजराम चव्हाण,बाजार समिती सभापती जितेंद्र रहांगडाले, नगराध्यक्ष अशोक असाटी, जि.प.सदस्य जगदीश बावनथडे,एड.माधुरी रहांगडाले,प्रवीण पटले चत्रभूज बिसेन,,तुमेश्वरी बघेले ,किरण पारधी ,मदन पटले,भाऊराव कठाणे,वसंत भगत,रवींद्र वहिले,संतोष चौधरी,सुनंदाताई पटले,भुमेश्वर रहांगडाले, प.स.सदस्य कविताताई सोनेवाने, जयप्रकाश पटले, कुंताताई पटले, प्रमिलाताई भलाई, सदस्य चेतलाल भगत. हुपराज जमाईवार, ज्योतीताई शरणागत, दिपालीताई टेंभेकर,रिताताई पटले, विजय बिन्झाडे,सरपंच चेतलाल पटले, सरपंच सरिता तुमसरे,सरपंच,सरपंच मनोज राऊत,सरपंच अनिता धुर्वे व गावकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

blank