25.6 C
Gondiā
Wednesday, July 29, 2026
Home शैक्षणिक धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची पंतप्रधानांसोबत संवादासाठी निवड

धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांची पंतप्रधानांसोबत संवादासाठी निवड

0
278

गोंदिया:धोटे बंधू विज्ञान महाविद्यालय, गोंदिया येथील सात राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) स्वयंसेवकांची “माय भारत बजेट क्वेस्ट 2026” कार्यक्रमांतर्गत भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या आभासी संवादासाठी निवड करण्यात आली होती. ही निवड प्रश्नमंजुषा स्पर्धा व निबंध लेखनातील उत्कृष्ट कामगिरीच्या आधारे करण्यात आली होती.
निवड झालेल्या स्वयंसेवकांमध्ये सुशांत संजय उके, हर्षिता गेंदलाल शिवणकर, ज्योती कालबांदे, सुरक्षा दिलीप लिल्हारे, खुशांगी तेजराम पाचे, विवेक नारायण साहू आणि हर्ष छत्रपती मेश्राम यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीद्वारे महाविद्यालयाचे आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. या निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव राजेंद्र जैन, संचालक निखिल जैन, प्राचार्य डॉ. मनोज पटले यांनी कौतुक केले. या उल्लेखनीय कामगिरीसाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राजकुमार पटले आणि डॉ. कल्पना घोषाल यांनी खूप प्रयत्न केले.

blank